चौकस,

अत्यंत सुंदर अनुभवकथन. खूप आवडले. रांगेतली बादली आवडली.  

उत्तरे तपासून त्या उत्तरांना गुण देणे हे काम सोडल्यास बाकीची कामे मी बाबांना करू द्यायचे नाही जेव्हा ते लॉ चे पेपर्स तपासायचे. वरील लेखात उल्लेखिलेली सर्व कारकुनी कामे करायला मला भयंकर आवडायचे ( जसे की आतील प्रत्येक प्रश्नासाठीचे गुण बाहेरील मुख्य पानावर मांडणे, मग त्यांची बेरीज करून मांडणे आणि मग शेवटी प्रत्येक विद्यार्थ्या/र्थीनीचे एकूण गुण एका वेगळ्या तक्त्यात भरणे आणि मग सर्व पेपर या तक्त्याच्या कागदासहित नीटपणे पार्सल मध्ये भरून पोस्टात जाऊन रजिस्टर्ड पोस्टाने पाठवून देणे ! ) आणि ते मी घरी होते तोवर हौसेने करायचे. आता ना ही कामे करायला मी तिथे आहे ना बाबा पेपर तपासत/लेक्चर्स घेत. अर्थात नापासचे पास वगैरे करणे बाबांच्या तत्त्वात कधी बसले नाही आणि त्यामुळे तो प्रकार मला कधी अनुभवावा लागला नाही, हे माझे सुदैव. ऑनररी लेक्चरर म्हणून बाबा शिकवायला जायचे तर तिथे त्यांना घेऊन जाणे आणि घेऊन येणे ही कामे करायची तर मधल्या वेळात टीपी करण्याऐवजी त्यांचेच लेक्चर्स अटेंड करायला धमाल मजा यायची कारण मग माझे प्रश्न विचारण्याचीही मुभा मिळायची. तूफान होते ते दिवस... आणि त्याहून तूफान होता तो आनंद जो अशी छोटीछोटी कामे करून मिळायचा.