खूपच सुंदर कथा. शेवटीशेवटी थोडी नाटकीय रित्या गुंडाळल्यासारखी वाटली असली तरी कथा अगदीच अवास्तव वाटली नाही कारण काहीसे निराळे असले तरी माझ्या बाबांनीही यशवंतासारखेच दिवस काढून आज आमच्यासाठी हे सोन्याचे दिवस मिळवले आहेत.. त्यांच्यापाशी तर ना कुंडलिकासारखे पोटाशी धरणारे बाबा होते ना चांदीचा करदोरा !
चौथीचा इतिहास खरंच अप्रतिम आहे जो असा कित्येक जणांना स्फूर्ती देता होत असेल यात तिळमात्र शंका नाही.
ग्रामीण बाज एकदम त्या वातावरणात घेऊन जाणारे. भल्याबुऱ्या आठवणीच आठवणी उजळून निघाल्या तुमच्या या कथेने. खरंच मनापासून धन्यवाद.