१९८९-९० सालाच्या आसपास कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापिठातील इंग्रजी विभागाने
"मराठी साहित्याचे इंग्रजी भाषांतर" या विषयावर एक परिसंवाद भरवला होता.
त्यात माझ्या वडिलांचे (ते इंग्रजीचे प्राध्यापक होते) एक छोटेसे भाषण होते.
त्याबद्दल त्यांच्याशी बोलताना ही कविता/वात्रटिका मला सुचली.
त्या परिसंवादात बोलताना वडिलांनी माझी ही कविता वाचून दाखवली होती.
खूप हशा आणि टाळ्या मिळाल्या असे त्यांनी मला कौतुकाने सांगितले होते.

बालके विसुची ही कविता/वात्रटिका गोड मानून घ्यावी.

अवांतर : "ही कविता माझ्या मुलाने केली आहे" हे त्यांनी त्या प्रकटनात नमूद केले होते.
मुलगा असले तरी काय झाले. कॉपीराईट असतोच ना?