सर्वप्रथम लेखाची त्वरित दखल घेत्यल्याबद्दल धन्यवाद.
तुम्ही म्हणता त्यात तथ्य असेलही. मला मात्र येथे पायची किंमत काढण्यासाठी अनंत मालिकेचा उपयोग कसा करायचा हे केरळी तज्ज्ञांना माहित होते, असे अनंत मालिकेच्या ज्ञानाचे उदाहर्ण म्हणून ह्या संशोधनात केलेला असावा असे मला वाटते. पाय हा लेखाचा विषय नाही ते केवळ एक उदाहरण आहे आणि शीर्षक आकर्स्ष्क करण्यासाठी मी तो वापरला आहे.
बाकी तुम्ही म्हणता तसे संशोधन केले तरी 'पुरावे' हाती लागणे कठीण दिसते. ऐतिहासिक असो, वैज्ञानिक असो नाहीतर गणिती असो मुद्दाम त्रयस्था साठी, कसलीही औपचारिक नोंद ठेवणे हे आपल्याकडे दुर्मिळच दिसते. त्यात ठेवलेली असली तरी मुद्दाम जतन केली गेली असण्याचीही शक्यता नाही. तेराव्या शतकातली ही परिस्थिती तर प्राचीन काळी काय असणार? आणि त्यातले काय सापडणार हा कुतुहलाचा भाग आहे. मँचेस्टरच्या लोकांनीही परिस्थितीजन्य पुरावाच सादर केलेला आहे.