तुम्ही म्हणता तसे संशोधन केले तरी 'पुरावे' हाती लागणे कठीण दिसते.
इतक्या प्राचीन गोष्टींचे ढळढळीत पुरावे शोधायचे नसतातच पण जमतील तेवढ्या शक्यता मांडायच्या असतात. शोधायचे म्हटले तर पुरावेही हाती लागतात पण आपल्याकडे याबाबत अनास्था दिसते.
वैज्ञानिक असो नाहीतर गणिती असो मुद्दाम त्रयस्था साठी, कसलीही औपचारिक नोंद ठेवणे हे आपल्याकडे दुर्मिळच दिसते. त्यात ठेवलेली असली तरी मुद्दाम जतन केली गेली असण्याचीही शक्यता नाही.
असहमत. आपल्याकडे अशा नोंदी ठेवल्या गेलेल्या आहेत. राजांच्या वंशावळी आहेत, प्राचीन ग्रंथ आहेत, पुराणांत नोंदी आहेत, पण वाचतो कोण आणि न वाचता हे शक्यच नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त.
असो.
लेख 'पाय'वर आधारित नाही हे मला लेख वाचून कळलेच होते. संदर्भ न्यूटनचा होता त्या आधीचा गणिती आणि पाय या नावाशी जुळणारे नाव म्हणून पायथॅगोरसचे नाव घेतले.