यावरून नुकतेच श्री. धनंजय देशपांडे यानी लिहिलेले वेदातील विज्ञान हे पुस्तक वाचले त्याची आठवण झाली.त्यानी वेदातील ऋचांचा अर्थ त्यांच्या पद्धतीने लावून पीरिऑडिक टेबलसुद्धा वेदात होते किंवा महास्फोट (बिग बँग) थेअरी वेदात होती असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्या पद्धतीने वेदात काहीही होते ( वा नव्हते?) असे सिद्ध करता येईल.मात्र वैदिक गणित उच्च प्रतीचे होते यात संशय नाही.