मनोगतावर अलिकदे मरगळ आली आहे असे वाटत होते. नाही म्हणजे, चांगले लेख प्रसिद्ध होताहेत, विडंबने जोरदार चालू आहेत, पण गरमागरम चर्चा काही कुठे दिसत नाही. मी मराठीच संकेतस्थळ वाचतो आहे ना, असा संशय यावा अशी परिस्थिती होती. सगळेच 'सुंदर', 'वा! अजून असेच लिहा', असे प्रतिसाद देत होते. एकंदरीत काय, आपण आपले इमान (दगडांच्या देशा... वगैरे) विसरलो होतो म्हणा ना! इतक्यात तुम्ही दिलेल्या ह्या दुव्यावर 'असे सांगणारे तुम्ही कोण?' असा रोखठोख सवाल वाचल्यावर तरतरी आली, आपण आपल्याच माणसात आहोत, ह्याची खात्री पटली.  ''तसेच' चालू दे, राव साहेब!