तुम्ही सर्वानि दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ह्या विषयाला एवढे वेगळे वळण लागेल अशी अजिबात अपेक्षा नव्हती. येथे कुठल्याहि सभ्य व्यक्तिचा किन्वा कुठल्याहि तत्त्वांचा अनादर करण्याचा अजिबात हेतु नव्हता. केवळ एक विनोद/विरंगुळा एवढाच हेतु होता. त्यामुळे जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर मी दिलगिर आहे.

   माझे एवढेच म्हणणे आहे कि पु. ल. देशपांड्यान्नी त्यांच्या व्यक्ति आणि वल्ली मध्ये अनेक व्यक्तिरेखान्वर विनोदि प्रसंग सादर केले आहेत. याचा अर्थ असा नाहि की त्या व्यक्तिरेखा चुकीच्या होत्या. माझी त्यांच्या बरोबर बरोबरी करण्याचि कुवत नाहि. परंतु एवढच वाटत की विनोदाबद्दल विनोदि द्रुष्टिकोनच असावा.