ताऱ्याभोवती ग्रह फिरत असल्यास तारा स्थिर राहू शकत नाही. जेवढे ग्रह अधिक तेवढे त्याचे गुरुत्वमध्याभोवती वॉबल होणे अधिक. तर ह्या वॉबल साठी कोणता शब्द योजावा?
मी लडखडणे असा शब्द वापरला आहे, मात्र तो हिंदी वाटतो, हिंदी लडखडना चे मराठी नाही. डुगडुगणे वा झोकांड्या देणे यामध्ये कोनीय विस्थापन (वाकणे) अपेक्षित असते तसे मला येथे वॉबल मध्ये अपेक्षित नाही. अडखळण्यामध्ये एखादी वस्तू/गोष्ट पायात आल्याने त्याला अडखळणे असे अपेक्षित असते, तसेही मला नको आहे. केवळ स्थिर राहता न येणे, वा सरळ नाकासमोर चालता न येणे अशा अर्थाने वॉबल होणे साठी प्रतिशब्द हवा आहे.