वॉबल चे डिक्शनरी डॉट कॉम जे अर्थ आहेत त्यातला एकेक घेऊन केपलरच्या ह्या पानावर जावे आणि तेथे जमतील तितके सगळे शब्द न्याहाळावे. बऱ्याच वेळा काही दिशा मिळते.

मी अनस्टेडी हा अर्थ घेऊन शोध घेतल्यावर मला चंचल, कंपित, चटुल, लोल (लोळणे?) इत्यादी अनेकानेक कुतुहलजनक शब्द मिळाले.

ही हालचाल शिस्तशीर नसते म्हणजे गबाळ असते असे म्हटले तर त्याचे (नवे?) क्रियापद करून गबाळणे असेही म्हणता येईल. (गळबटणे असेही एक क्रियापद आहेच)