लटपटणे तसे ठीक आहे, तरी, लटपटण्यामध्ये बळ वा त्राण जाणे, थरथर, कंप अंतर्भूत असतो, जो मला अपेक्षित नाही. उदा. पाय लटपटणे. ह्यात तुम्ही चालत असताच असे नाही. बसल्याबसल्या पाय लटपटू शकतात, तेव्हा पायातील बळ जाते आणि पाय कंप पावतात.