नमस्कार,
मी स्कॅनींग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वर काम करतो. त्यात आपण एखादा बिंदू फोकस केला की मग तो इतर काही परिणामांमूळे हलत नाही ना हे पाहण्यासाठी वॉबल नावाची कळ असते. ती दाबली की तो बिंदू अस्थिर होतो. वर खाली आडवा उभा असा तो कसाही हालू लागतो. कधी तर तो थोडा गोल सुद्धा फिरतो. तर ताऱ्यांची इतर गुरुत्वीयशक्तींमुळे अशीच हालचाल होत असेल असे मला वाटते. त्याला हिंदोळणे हा शब्द मला बरा वाटतो.
( अनेकदा वाफ्टिंग या श्ब्दासाठी म्हणजे होडीचे हिंदोळणे, झोपाळ्याचे होंदोळणे या साठी आपण तो वापरतो. पण यातील झोपाळा हा दोलायमान असतो. पण होडी वर-खाली, मागे पुढे, म्हणजे तीनही मीतिंमध्ये हालते झोपाळ्याचे हलणे थोडे वेगळे.)
--लिखाळ.