मराठ्यात [सर्व मराठी मंडळी]  कुणी पोहे न खाल्ल्याचे ऐकीवात वा वाचनात नाही.[तळलेले] पोहे हाही विशिष्ट 'छंदिष्टांचा' चाखण्याचा प्रकार आहे. मिळण्यास स्वस्त असल्याने काजुच्या सुट्या दाण्याप्रमाणे त्याची गोडी चाखता येते.पोहे करण्याचा हा माझा हजारावा प्रयत्न!

१ मद्याइतका सोबती दुसरा कुणी नसे
  मद्याचे उपकार मी फेडू सांग कसे?

२ जपले आहे आजतो या ग्लासांना फार
  सोसत नाही यापुढे या ग्लासांचा भार

३ एकटेपणी टाळतो तुझेच सारे भास
  तू नसताना साहतो तुझा असा सहवास

४ घडते आहे वेगळे 'विशेष' काही आज
  'ती' घेण्याने बदलतो सभोवती अंदाज