फरासखानाचा अर्थ नेमका काय होतो ते मलाही माहीत नाही. पुण्याच्या फरासखान्यात काय काय सुविधा आहेत/होत्या त्याचीही मला कल्पना नाही. (कदाचित जुन्या एखाद्या ऐतिहसिक इमारतीत नंतर पोलीस कार्यालय उघडलेले असेल. (जसे विश्रामबागवाडा पोलीस कार्यालय) चू. भू. द्या. घ्या.)

...
आणि तुम्ही तो शब्द न चुकता ओळखलात यात सगळे आले.


माझ्या माहितीनुसार, फर्श म्हणजे जमीन. (अर्श म्हणजे आकाश) फर्राश म्हणजे जमिनीचे अंथरावयाची वस्तू, थोडक्यात जमिनीचे अंथरूण. पुण्याच्या फरासखान्यात पेशव्यांचे मोठमोठे तंबू, गालिचे आदी ठेवत असत. बाकी पुण्याच्या फरासखान्यात काय काय सुविधा आहेत/होत्या याची मलाही कल्पना नाही.

शोधसूत्रामागील सूत्र कळाले. आगामी शब्दकोडी सोडवताना नक्कीच फायदा होईल. फरासखाना हा शब्द मी ओळखला नव्हता. इतरांनी दिलेले उत्तर वाचून मनात शंका आली.

धन्यवाद.

चित्तरंजन

प्रशासकांसाठी:
मजकूर उद्धृत करताना प्रत्येक वेळेस उभी निळी रेघ येत नाही. कधी कधी उद्धरण/अवतरण वापरले की मजकूर समासात उजवीकडे सरकतो. वानगीदाखल मी उद्धृत केलेला मजकूर बघावा. (मी फाफॉ वापरतो.)