आंदोळणे आणि हिंदोळणे ह्या दोन क्रियापदांच्या अर्थामध्ये फरक आहे का? ही दोन्ही क्रियापदे मला sway ह्या इंग्रजी क्रियापदासाठी अधिक योग्य वाटली, तरी आतापर्यंतच्या सुचवण्यांमध्ये हिंदोळणे हे क्रियापद अधिक जवळचे वाटले.

हेलावणे हे क्रियापद नेहमी मानसिक अवस्थेसाठी वापरलेले मी पाहिले आहे, शारीरिक अवस्था दर्शविण्यासाठी नाही. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरले तरी ग्रह-ताऱ्यांच्या संदर्भात ते मला योग्य वाटत नाही.

हिंदी वाटले तरी मी मुळात वापरलेले 'लडखडणे'च कायम ठेवावे अशीही सुचवणीही मला मिळाली आहे. तेव्हा लडखडणे वा हिंदोळणे ह्यापैकी एक क्रियापद वापरेन. 

शब्द सुचवणाऱ्या सर्वांचे आभार.