घिरट्या घालणे असे क्रियापद वापरावे असेही वाटते आहे. तारा स्थिर न राहता ग्रहाच्या प्रभावामुळे गुरुत्वमध्याभोवती फिरू लागतो, मात्र प्रत्येक फेरीचा मार्ग आधीच्या फेरीपेक्षा वेगळा असतो. घिरट्या घालताना साधारण वर्तुळाकार कक्षेत घातल्या जातात, व प्रत्येक घिरटीचा मार्ग वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे घिरट्या घालणे चालू शकेल असे वाटते.

हिंदोळणे बद्दल जास्त विचार केला असता, लटपटणे प्रमाणेच हिंदोळणे हेही पुढे पुढे न जाता एकाजागी होऊ शकते. मला वॉबलमध्ये स्थिरतेपासून ढळताना मार्गस्थ होणे, पुढे जाणे ही अपेक्षित आहे, ते हिंदोळणे मध्ये अंतर्भूत असेलच असे नाही.

एकंदरीत, लडखडणे वा घिरट्या घालणे हे पर्याय योग्य वाटत आहेत.