घिरट्या कशाच्यातरी भोवती मारतात (कदाचित स्वतःच्याही ?) मात्र गिरक्या फक्त स्वतःच्याच भोवती मारतात असे वाटते.

आणखी खोलात जाऊन विचार केला तर घिरट्या मारताना स्थलांतराची मिती घनफळातून स्पष्टपणे बाहेर आलेली दिसते. गिरकीत स्थलांतराची मिती घनफळातून बाहेर आलेली दिसत नाही. किंवा घिरटीत एकदा व्यापलेल्या अवकाशातून शरीर केव्हातरी पूर्ण बाहेर येते. गिरकीत शरीराचा काही ना काही भाग आधी व्यापलेल्या अवकाशातच राहतो... किंवा घिरटीत कक्षेची त्रिज्या वस्तूच्या त्रिज्येपेक्षा जास्त असते. गिरकीत ती वस्तूच्या त्रिज्येपेक्षा कमी असते ... असे काहीसे.

त्यामुळे तुमच्या वर्णनाप्रमाणे मला गिरक्या जास्त बरा वाटतो.