चालू दे, वाचायला मजा येते.

आवडल्या त्या इथल्या आज्या. मस्त साठी-सत्तरी ओलांडलेल्या, सोळावं लागल्या प्रमाणे गळ्यात कॅमेरा अडकवून फुटाण्यांप्रमाणे सगळीकडे नाचत असतात.

वा!वा! मलाही अमेरिकन आज्या आवडतात. आपल्याला शोभतील असे कपडे, छान बॉब केलेले केस (एक पाहा, अमेरिकेत वृद्ध स्त्रियांचे केस लहान कापलेले असतात. का ते मला कळले नाही, पण निरीक्षण करून पाहा. ९९% आज्यांचे केस कमी कापलेले आढळतात. हे माझ्या लक्षात आल्यापासून मी केसांची लांबी मानेपर्यंत ठेवते.   )मॅनिक्योअर करून रंगवलेली लांब लांब नखं, मेक-अप, आभूषणे घालून नटलेल्या असतात.

सोबत कधी नातवंडं असतील, म्हणजे कधी त्या बेबीसिटींग करत असतील तर त्या पोरांना सांभाळून या वयातही अप-टू-डेट राहण्याचं कौतुक वाटतं.