सामान्यत: घिरट्या घालणे हा शब्दप्रयोग काहीतरी (मुख्यत: सावज़) पकडण्याच्या हेतूने (घार, गिधाड, ससाणादी पक्षीवर्गातील कोणीतरी) केलेली मोर्चेबांधणी दर्शवितो, असे वाटते. किंवा एखाद्या विमानाने विमानतळावर उतरण्यापूर्वी आकाशात घिरट्या घालणे, टेहळणी करावयाच्या हेतूने घिरट्या घालणे अशा अर्थाने. अशा घिरट्या घालण्यानंतरची क्रिया सामान्यत: लक्ष्य ज़ागी स्थिरावणे अथवा दूर निघून ज़ाणे, ही अपेक्षित असावी; घिरट्या घालण्याच्या अशा क्रियेवर कालमर्यादा अपेक्षित नाही का? ग्रहताऱ्यांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास गुरुत्त्वमध्याभोवती ठराविक काळ घिरट्या घातल्यानंतर ताऱ्याकडून कोणती क्रिया होणे अपेक्षित आहे? स्थिरावणे की गुरुत्त्वमध्याभोवती फिरत राहणे? स्थिरावणे अपेक्षित नसल्यास घिरट्या घालणे सदोष वाटते; गिरक्या जास्त योग्य वाटते. चूभूद्याघ्या.