घिरट्या घालण्याचा उद्देश शेवटी सावजापाशी पोहोचणे हा असतो हे बरोबर आहे. मात्र उद्देश वगळता घिरट्या घालण्याच्या भौतिक क्रियेचे ताऱ्याच्या गुरुत्वमध्याभोवती फिरण्याशी साधर्म्य आहे असे म्हणता येईल.

गुरुत्वमध्यापासून किंचित ढळणे अपेक्षित आहे म्हणजे काय? तारा हा गुरुत्वमध्याभोवती फिरतो आहे. तो स्थिर नाही म्हणजेच ढळला आहे. त्याच्याभोवती ग्रह आल्यामुळे गुरुत्वमध्यच ताऱ्याच्या मध्यापासून ढळून थोडा बाहेर गेला आहे कारण तारा एकटा न राहता तारा आणि ग्रह मिळून संयुक्त संस्था तयार झाली आहे. असो.

एकूण घिरट्या शब्दावर अनेकांचा आक्षेप दिसतो आहे. गिरकी मध्ये केवळ दिशा बदलून पुरते. विस्थापन न होताही गिरकी मारता येते कारण गिरकी ही नेहमी स्वतःभोवती असते. मला ताऱ्याने स्वतःभोवती नाही तर गुरुत्वमध्याभोवती फेरी करणे अपेक्षित असल्यामुळे मला गिरकी शब्द योग्य वाटत नाही. घिरटीमध्ये कशाच्या तरी भोवती फिरताना (दिशा बदलणे) विस्थापन होणेही आणि त्यामुळे कक्षा निर्माण होणेही अपेक्षित असते, जे ताऱ्याच्या फिरण्यामध्ये दिसते म्हणून मी घिरटी शब्द वापरला.

असो. तर एकंदरीत लडखडणे हा शब्द हिंदी वाटला तरी (त्याचे मराठीकरण केल्याने) तो तसाच वापरण्याव्यतिरिक्त पर्याय दिसत नाही. मात्र शब्दांचा उहापोह चांगल्या प्रकारे झाला, धन्यवाद.