विकी,

मी ह्या बाबतीतला जाणकार नाही, पण माझे थोडेसे. संपूर्ण महाराष्ट्राला एकच दैवत असण्याची जरूरी काय आहे? बरे, आपण जी मांदियाळी सांगितली आहे ती सर्व हिंदू देवदेवतांची आहे. मग बौद्ध, मुसलमान, ख्रिश्चन ह्यांचे काय? उत्तर असे, प्रत्येक व्यक्तिनेही स्वतःचे वेगळे दैवत मानले तरीही काहीही बिघडत नाही. आणि ते दैवत धार्मिक संदर्भ असण्याची अजिबात जरूरी नाही. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, आचार्य अत्रे, साने गुरूजी, गाडगे महाराज, बाबासाहेब आमटे, वगैरे निष्ठेने कुठल्याही लोभाची अपेक्षा न धरता, सामाजिक उद्धार करणाऱ्या अनेक व्यक्तिंची महाराष्ट्रात परंपरा आहे, त्यांपैकीही कुणीही एखाद्याचे दैवत असू शकते.