मुळात महाराष्ट्र शैव आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी त्र्यंबकेश्वर, भिमार्जुन, घृष्णेश्वर महाराष्ट्रात आहेत, मल्लिकार्जुन, ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरास मराठी इतिहास आहे. महाराष्ट्रातील बहुतेक प्रमुख जातींचे कुलदैवत खंडेराव आहे. महाराष्ट्रातील मराठे, ब्राह्मण पोटजातींचे सुद्धा शिवहेच (भैरोबा, खंडोबा, मंगेशी, वाडेश्वर) कुलदैवत आहे. अष्टविनायक महाराष्ट्रात आहेत पण गणपती कुठे कुलदैवत असल्याचे वाचनात नाही.
प्रत्येक गावाचे गावदैवत वेगळे असते, शक्यतो, ग्रामदेवतेचे देउळ गाव-शीवेवर असते. पुण्याचे ग्रामदैवत योगेश्वरी आहे. मुंबईचे (तीनवेळा हलवलेली) मुंबादेवी.
१२ व्या शतकापासून भक्तिमार्गास लागलेल्या महाराष्ट्राचे दैवत, डोक्यावर शिवपिंड घेऊन महाराष्ट्रात प्रवेश मिळवलेला विठ्ठल आहे.