पुणेरी बोलीत 'लई चिडचिड'
आपल्याच हातानी आपल्याच थोबाडीत मारल्यावर, आता शिव्या हाताला द्याव्या की, गप्प बसल्याबद्दल तोंडाला? अशी त्यांची स्थिती झाली आहे. हेच कम्युनिस्ट काही आठवड्यांपूर्वी त्यांचे लाडके होते. फार पूर्वी कम्युनिस्टांनी लाथा घालून ह्यांना आणि ह्यांच्या मानवतावादी गुरूंना हाकलल्यानंतरही, काँग्रेसला समर्थन दिल्यापासून केतकर कम्युनिस्टांचे मुके घेत होते. आता बाजूला झाल्याझाल्या तोंड तुरट झाल्याचा साक्षात्कार केतकरांना झालाय. सोनियांचे सरकार स्थापन झाल्यानंतर धर्मनिरपेक्षांध पक्षांना केतकरांनी डोक्यावर घेतलं होतं. त्यावेळी शिव्या देतांना प्रमुखपणे संघ, भाजपा, तोंडी लावायला शिवसेना, रुचीपालट म्हणून अमेरिकेचे मध्यपूर्वेतील हस्तक्षेप हे विषय त्यांना पुरत असत. पवारांचे राजकारण त्यांना कळत नसल्याने भैरोसिंगाना पाठींब्याच्या बदल्यात पंतप्रधानपद वगैरे खडे ते टाकत असतातच, पण पवार त्यांना दरवेळी फसवतात. उ.प्र. निवडणूकांपासून समाजवाद्यांना शिव्या द्यायला सुरवात केली आणि गेल्या २-४ आठवड्यांपासून डावे.
आजच्या लोकसत्तेत चक्क सावरकरांची बातमी वाचली. बहुतेक त्यांच्या नकळत छापली असावी, देव करो आणि त्यांच्या दृष्टीस ती बातमी न पडो. त्यांनी काही बरंवाईट करून घेतलं तर माझे संपादकीय मनोरंजन बंद होईल.