आपले म्हणणे काही अंशी पटले तरी परदेशातील कसोट्या भारतात लागू पडतीलच असे नाही.तिकडची मानसिकता वेग़ळी आहे.
तुम्ही म्हणता तसे असेल पण अगदी उलटेसुलटे असेल असे मला वाटत नाही. तुमही जास्त विस्ताराने तुमचे म्हणणे सांगितलेत तर समजायला जास्त सोपे पडेल असे मला वाटते. उदाहर्ण द्यायचे तर मानसिकता कशी वेगळी आहे असे तुम्ही म्हणता ते सांगाल का?
कदाचित भावना व्यक्त करण्याची पद्धत, मोकळेपणा, ह्यात फरक असेल पण मानसिकतेत फरक असेल असे तुम्हाला खरेच वाटते का?
एकमेकांविषयीची भावना मनसिकता जगभर एकच असणार नाही का?