केले हे करणेचे भूतकाळाचे रूप तर आहेस शिवाय ते करणे ह्या क्रियापदाचे भूतकाळवाचक(?) नामही आहे. (नपु.) (अर्थ : केल्याची घटना)
उदा. इतके कष्ट केल्याचे फळ मिळाले.
येथे केले ह्या नामास षष्ठीचा चे हा प्रत्यय लागला आहे.
केल्या हे केले ह्या नामाचे सप्तमीचे रूप. अर्थ : केल्यावर (सप्तमीने जसे स्थान दाखवतात तशी वेळ ही दाखवतात. उदा. वेळेवर येणे)
उदा. भाकरी केल्या केल्या खाल्ली.
काही केल्या म्हणजे काही केल्यावर(ही) काही करूनही..... असे काहीसे.
चू.भू.द्या.घ्या.