अर्थात जे काही ते मस्तच आहे. ( अगदी मनापासून बरं केशव महाराज ..)

काही प्रश्न मनात येतात...

१) भांडी घासणारी बाई भांडी घासायची सोडून न्हाणीघरात काय करते ?

२) तिला तुम्हाला मनातलं काही सांगायचं तर नसेल ? तिचा कदाचित गैरसमज झाला असेल की अंघोळ झाल्याशिवाय तुम्ही ऑफिसला जाणार नाहीत. त्यात तुम्ही वस्ताद निघाल्याने बिचारी ( पंढरीच्या पांडुरंगासारखी ) तुमच्या त्याच जागेवर वाट तर बघत नसेल ?

३) तुमची घरवाली (अर्थात असल्यास) त्यावेळी कुठे असते ?

४) एखाद्या दिवशी लवकर उठून तिच्यावर नजर ठेवायला काय हरकत आहे ? की ती नक्की किती वाजता न्हाणीघरात जाते.

बाकी दमदार लिखाणामुळे प्रतिक्रिया लिहावी वाटली एवढंच. कृपया रागावू नका.