हे नव्या पिढीच्या मानसिकतेचे चित्रण म्हणावे का? पण नव्या पिढीतील एकजात सगळेच असाच विचार करत नाहीत असेही वाटले. कदाचित एकच अशी इंटरेस्टिंग व्यक्ती असेल, जिचे आपण चित्रण करत आहात. पण मग कितीतरी नव्या हिंदी चित्रपटांचा विषयही असाच का असावा? ही व्यक्ती प्रातिनिधिक आहे असा त्याचा अर्थ होतो. मग कुठल्या प्रवाहाचे प्रतिनिधित्व आहे हे? ही निराशावादी विचारांची लाट का बरे. कुठल्या अनुभवांमधून हा प्रवाह तयार झालाय? त्या अनुभवांबाबत काय करता येईल? हा अनुभव त्या प्रवाहातल्या सगळ्यांना असाच आलाय का? की एकाचा अनुभव बघून किंवा ऐकून अनेक जण त्या प्रवाहात सामील झालेत? ग्लॅमर म्हणावे तर तेही नाही या मानसिकतेला. मग जे सुंदर नाही त्याकडे ओढली जाणारी ही कुठली मानसिकता? याला नाव आहे का?

काही नवे हिंदी चित्रपट पाहून जे वाटले, तेच हे वाचूनही वाटले. काहीतरी खटकतेय, ते नक्की काय हे मात्र सांगता आले नाही. प्रयत्न केला. पण तो अगदीच स्वतःशीच केलेला संवाद, मोनोलॉग, असा उतरला आहे. तेव्हा या प्रतिसादाकडे फार लक्ष देण्याची गरज नाही.

आपण जाणताच की हे वाटणे आपल्या त्या काल्पनिक व्यक्तीच्या मानसिकतेबद्दल आहे. आपण लेखक म्हणून आपली भूमिका उत्तम रित्या पार पाडली आहे. तेव्हा त्याबाबत शंका नसावी.

-प्रभावित