स्वैराचार म्हणजे  स्वातंत्र्य असा खुळचट अर्थ काढणाऱ्याचे हे मनोगत मुळीसुद्धा प्रातिनिधिक वाटत नाही. असे अनिर्बंध स्वातंत्र्य आदिमानवालासुद्धा नव्हते आणि कधीही पारतंत्र्य न पाहिलेल्या देशांमधील नागरिकांनाही आजही मिळत नाही.  कायद्याच्या राज्यात जशी माणसावर बंधने येतात त्याहून अधिक बंधने 'जिसकी लाठी उसकी भैंस' या जंगलाच्या कायद्यात येतात. ज्यांना जगातील चांगले कांही दिसतच नाही अशी विकृत मनोवृत्ती बाळगणाऱ्या मनामधील हा उद्वेग आहे.