दडपे पोहे करताना जाड पोहे सुद्धा वापरतात.जाड पोहे थोडे भिजत̱̱ घालावेत.त्यामध्ये थोडी भिजलेली चण्याची डाळ घालावी.थोडे दही घालावे. चविनुसार साखर,मिठ व बारीक चिरलेल्या मिरच्या घालाव्या.त्यानंतर फोडणी तयार करावी.त्यामध्ये तेल,मोहरी,हिंग,हळद,तिखट टाकावे.भिजलेल्या पोह्यांना ही फोडणी वरुन द्यावी.या पद्धतीने केलेले दडपे पोहे सुद्धा छान लागतात.