चपखल स्वगत आहे. प्रत्येक पिढीकडे आधिच्या पिढ्यांपेक्षा वेगळी स्वत:ची अशी निवडक दांभिकता असते. दारू, व्यभिचार, महागडे फोन असा स्वत: सगळा चंगळवाद करून पुन्हा दुसऱ्याचा चंगळवाद डोळ्यात खुपतोय. परत हे सगळं भोगायची ज्यांनी संधी दिली त्यांना आणि स्वातंत्र्याला शिव्या. सुख दुखतं म्हणतात ते यालाच.