माझ्या मतेही दडप्या पोह्यात फक्त पातळ पोहेच वापरतात.
कारण असे की पातळ पोहे त्यात टाकलेल्या कांद्यामुळे थोडावेळ 'दडपणा' खाली ठेवल्यावर मऊ होतात. 'दडपणा'खाली ठेऊन केलेले म्हणून 'दडपे' पोहे.
बाकी पोहे करण्याच्या अनेक पद्धती आहेत. प्रत्येक प्रांतात, प्रदेशात, कुटुंबात वेगवेगळ्या पद्धतीने पोहे करतात. ते चांगलेही लागतात. पण दडपणाखाली ठेवून केले नसतील तर त्यांना 'दडपे पोहे' म्हणता येणार नाही.