आपने जीने ना दिया

असे काहीसे गाणे आहे. मला सगळे पाठ नाही. शार्दूलविक्रीडित वृत्त नीट जमले आहे असे वाटते. मात्र

वाटे, दुःख तुझे असे जर मनी राहील रात्रंदिन,
येतो प्राण गळ्यात, वाटुन मनी, 'कंठू कसे जीवन?'
ओढीने तव वेदनेस मनिच्या ओठी न येऊ दिले

ह्या तीनही ओळीत मनी हा शब्द जवळजवळ त्याच स्थानी आलेला आहे त्याऐवजी वेगवेगळा शब्द वापरता आला असता तर कानाला बरे वाटले असते असे वाटते.