भाग चांगला आहे, परंतु नेहमीप्रमाणे रंगत वाटली नाही याचे कारण या विषयावर अनेकांनी अनेकदा लिहिले आहे त्यामुळे फारसे नाविन्य वाटले नाही. परंतु लेखमालेतील एक लेख म्हणून तो अपेक्षित होताच. विरस करण्यासाठी हा प्रतिसाद नाही हे नमूद करावेसे वाटते. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.
जगात इतकं काही खाण्यासारखं असताना हे आपले शेजारी अस काहीतरी का खातात कोण जाणे!
हे वाक्य मात्र पटले नाही. उलट मला आपल्या शेजाऱ्यांचे कौतुक वाटते. (त्या कौतुकात सामील होण्याची हिम्मत नसली तरी) बांबूपासून बेडकापर्यंत काहीही खाऊ शकणारी ही जमात अतिशय चिवट असावी. चिनी अन्नात मांस आणि भाज्या, भात यांचा समावेश असतो. मार्को पोलोने येथूनच पिझ्झा इटलीला नेला असे म्हटले जाते. जे काहीही खाऊ शकतात ते कोठेही, कोणत्याही परिस्थितीत तगही धरू शकतात. ही गोष्ट मला अत्यंत कौतुकास्पद वाटते आणि इतरांच्या अन्नाला कधी नावे ठेवू नये ही देखील.