असा विचार मी नक्कीच करू शकत नाही. पण आपल्या तरुण पिढीतला एक वर्ग असे विचार करतो. त्यांना मिडिया उपलब्ध करून द्यायचा उद्देश आहे. माला मनापासून वाटतं की हे सगळं चुकीचं असलं तरी चूक नव्या पिढीची नाही आहे. कोणाचीच नाही आहे. परिस्थितीची आहे.

अतिशय लहान वयात मिळत असलेला पैसा आणि पश्चिमेकडचं ते सगळं चांगलं असा मिडिया ने केलेला अपप्रचार ह्याची ही परिणिती आहे असं वाटतं. ह्याला उत्तरं कोणी शोधायची? माझ्या जवळ असं कोणतंही उत्तर नाही. म्हणून हा प्रश्न मांडण्याचा हा प्रयत्न आहे.

काही वाचकांना असे प्रश्न आहेत हेच पटलेलं नाही. निदान अशा शक्यतेचा विचार तरी त्यांच्या मनात अशा लिखाणाद्वारे व्हावा हा उद्देश आहे.