प्रशासक,
आपण लिखाणाचा काही भाग संपादित केला आहे. मला मान्य आहे की संपादित केलेले शब्द हे असभ्य आहेत. पण अशी भाषा समाजात सर्रास वापरली जाते, तर मग ती मनोगतावर का वापरता येऊ नये? अशा भाषेचे उदात्तीकरण करण्याचा हेतू नाही. पण परिणामकतेच्या दृष्टीने ती आवश्यक आहे असे वाटते. आणि जर मनोगतावर आपल्या समाजाचे योग्य प्रतिबिंब पडावे अशी अपेक्षा असेल तर अशी भाषा लिखाणात येणारच.
आपण डोळे मिटून घेतले म्हणजे आपल्या आजूबाजूची घाण नाहिशी होत नाही.
- कोहम