श्री. केशवसुमार,
धन्यवाद.
श्री. भानस,
( सात्त्विक संताप जाणवला. )
आजकाल प्रसारमाध्यमांना त्यांची नैतिक आणि सामाजिक जबाबदारी समजत नाही हेच खरे.
श्री. अरुण वडुलेकर,
हा खाजगी चॅनल आहे. मनोगत डॉट कॉम......
श्री. टवाळ,
चार पत्रकारांच आणि त्यांच्या मालकांच पोट अवलंबून आहे त्यावर.
अजिबात तसे वाटत नाही. ह्या पूर्वी जेंव्हा प्रसारमाधम्ये आपली जबाबदारी आणि नैतिकता सांभाळून बातम्या द्यायचे तेंव्हाही ते पोट भरतच होते.
ह्या मागे, स्पर्धेचा, विनाकारण, केलेला बाऊ आणि जास्तीत जास्त पैसा कमविण्याची अघोरी लालसा आहे असे मला वाटते. मग त्यासाठी नैतिकता, सामाजिक बांधिलकी ह्यांचा बळी दिला तरी चालेल ही वृत्ती आहे. आपण एका गुन्हेगाराला साथ देऊन स्वतः एक गुन्हाच करीत आहोत असे प्रसारमाध्यमांना वाटतच नाही.
अजून छापील वृत्तपत्रांनी हा मार्ग अनुसरलेला नाही. तेही पोटे भरतच आहेत. असो.