लोकसत्ताच्या पहिल्या पानावर संजय दत्तशी हस्तांदोलन करण्यासाठी पुण्याच्या हवालदारांची झुंबड अशी चित्रासहित बातमी आहे.

अजून काय व्हायला पाहिजे???

अवांतर: अशा प्रसिद्धीमाध्यमांबद्दल लोकसत्तामध्येच भाड्याने लोक घेऊन त्यांच्या सहाय्याने धुमाकूळ घालायचा व ही बातमी "ब्रेकिंग न्यूज"म्हणून द्यायची असले उपद्व्याप ह्या वाहिन्यांनी सुरु केले आहेत अशी बातमी आली आहे. त्या बातमीची लिंक इ-आवृत्तीत उपलब्ध नाही. पुणे आवृत्तीमध्ये आतील पानावर "श्री.पु.भागवतांवर अंत्यसंस्कार" या बातमीखाली ठळक टाईपमध्ये ही बातमी छापली आहे.

अधिक माहिती अशी रिपब्लिकन पक्षाच्या बोगस कार्यकर्त्यांचा वापर करुन एका सायबर कॅफेवर हल्ला झाल्याची ब्रेकिंग न्यूज एका वाहिनीने दिली. मात्र अधिक तपास केला असता असा सायबर कॅफे अस्तित्त्वातच नाही. आणि त्या वाहिनीने ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी चित्रपटाप्रमाणे सायबर कॅफेचा "सेट" उभारुन काही नकली कार्यकर्त्यांना पैसे दिले व ह्या कॅफेवर हल्ला करण्यास सांगितले. ही बातमी नंतर दिवसभर "ब्रेकिंग न्यूज" म्हणून सरपटत होती.