धन्यवाद श्री. चक्रपाणी.
श्री. आजानुकर्ण,
लोकसत्ताच्या पहिल्या पानावर संजय दत्तशी हस्तांदोलन करण्यासाठी पुण्याच्या हवालदारांची झुंबड अशी चित्रासहित बातमी आहे.
टीव्ही वरील बातम्यांमध्ये सुद्धा पोलीस दलाची ती लाजिरवाणी धडपड पाहावयास मिळाली.
रिपब्लिकन पक्षाच्या बोगस कार्यकर्त्यांचा वापर करुन एका सायबर कॅफेवर हल्ला झाल्याची ब्रेकिंग न्यूज एका वाहिनीने दिली. मात्र अधिक तपास केला असता असा सायबर कॅफे अस्तित्त्वातच नाही. आणि त्या वाहिनीने ब्रेकिंग न्यूज देण्यासाठी चित्रपटाप्रमाणे सायबर कॅफेचा "सेट" उभारुन काही नकली कार्यकर्त्यांना पैसे दिले व ह्या कॅफेवर हल्ला करण्यास सांगितले.
आपण दिलेली बातमी नुसती धक्कादायकच नाही तर प्रसारमाध्यमांना लांच्छनास्पद आहे. अशा वाहिन्यांना कायदेशीर कारवाई द्वारे किमान एक वर्षाकरिता कुठल्याही बातम्यांचे प्रसारण करण्यासाठी बंदी केली पाहिजे.