वा..वा..! हा तर माझा जिव्हाळ्याचा विषय. अतिशय सुरेख लिहिले आहे. अभिनंदन.

ह्या खाद्यपंढरीत खाल्लेल्या एकेका पदार्थावर लिहायचं तर नवी लेखमालाच चालू करावी लागेल.
जरूर सुरू करा. आम्हाला वाचायला आणि (जमल्यास) खायला आवडेलच.

या अश्या शहरात मी ठरवलंय की दर आठवड्याला एक तरी न चाखलेला पदार्थ खायचा.
ह्यालाच खवय्येगिरी म्हणतात. खवय्या हा चवीसाठी खातो. पोट भरण्यासाठी नाही. (अर्थात दुर्दैवाने पोट भरतेच.)


आईच्या हातची तव्यावरची पोळी आणि गरम गरम भाजी याची तोड ह्या खाद्यपंढरीतील एकही पदार्थाला येईल का?
लाख मोलाचा सवाल. माझी बायकोही तिच्या आई बद्दल असंच म्हणते आणि मी त्याच्याशी सहमत आहे.