अशा बातम्या पाहून धक्का वाटण्याचे दिवस कधीच गेले आहेत. काही दिवसांपूर्वी इंडिया टीव्हीच्या वार्ताहरांनी ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी उत्तर भारतात एका दुकानदाराला आत्मदहन करण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले होते. त्या घटनेत तो दुकानदार मरण पावला. १ ऑगस्ट २००७ रोजी आयबीएन-७ व स्टार न्यूजच्या पत्रकारांनी वाराणसी येथे झालेल्या निदर्शनांमध्ये सनसनाटी निर्माण करण्यासाठी ११ जणांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले त्यात ५ जण मृत्यू पावले.
ह्या सर्व वाहिन्या अजूनही व्यवस्थित चालू आहेत.