सर्वप्रथम, आपण माझे लेखन वाचलेत आणि आवर्जून प्रतिसाद दिलात त्या बद्दल धन्यवाद.

'महात्मा' हा शब्द इथे उपरोधाने वापरला आहे.

वृत्त वाहिन्या ज्या प्रकारे संजय दत्तच्या दिनःश्चर्येचे प्रसारण करीत आहेत त्यावरून तो कोणी गुन्हेगार नसून न्यायसंस्थेच्या मनमानीचा बळी, तमाम भारतीयांच्या गळ्यातील ताईत आणि त्याने (न्यायसंस्थेच्या मतांनुसार) काही गुन्हा केला असेलच तरी तो १००% माफीचा हक्कदार असलेला कोणीतरी 'महात्मा' असल्याचा भास निर्माण केला जात आहे, असेच जाणवते आहे.

'महात्मा' शब्द असा व्यंगात्मक वापरू नये.त्या शब्दाभोवती आपल्या सर्वांच्या भावना गुंतल्या आहेत, नाही का?
हे बाकी अजिबात पटले नाही. 'महात्मा' हा शब्द म्हणजे कोणा एकाची मक्तेदारी नाही. स्वतः 'त्या' महात्म्यांना देखिल कधी असे वाटले नसावे. 'महात्मा' शब्द व्यंगात्मक वापरल्याने महात्मा गांधींचा अथवा महात्मा ज्योतिबा फुल्यांचा अवमान होत नाही. त्यांना बहाल केलेले 'महात्मा' हे बिरुद इतके कचकड्याचे नाही की कुणा प्रभाकर पेठकरने ते व्यंगात्मक वापरले म्हणून मोडून जायला. असो.

शेवटी भाषेची शुचिता आपणच ठेवायला हवी.
भाषेची शुचिता सांभाळली गेली नाही असे मला वाटत नाही. पण तसे झाले असेलच तर श्री. प्रशासक आक्षेप घेऊन कारवाई करू शकतात.

ह्या प्रतिसादात मात्र अनवधानाने कठोर शब्दांचा वापर झाला असेल अथवा काही कठोर भावना ध्वनीत होत असतील तर माफी मागतो. माझा उद्देश कोणाचा अपमान करण्याचा नाही.