सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियांबद्दल मनापासुन धन्यवाद!
"जगात इतकं काही खाण्यासारखं असताना हे आपले शेजारी अस काहीतरी का खातात कोण जाणे" हे वाक्य इतक्या प्रतिक्रियांचं धनी होईल हे लिहिताना वाटलं नव्हत. पण मी हा माझ्याच सदोष वाक्यरचनेचा परिणाम समजतो. मला कोणाच्याही अन्नाला नावं ठेवायची नव्हती (जो जे वांच्छील, तो ते खावो.. अगदी पटलं
) फ़क्त त्यांच्या काहीही खाण्याबाबत असलेलं आश्चर्य व्यक्त करायचा हेतु होता. [पुनरावलोकनानंतर माझीच भाषा मलाच खटकतेय खरी, पण हे मान्य करेल तो मराठी कसला
].
सुप्रिया, मी अजूनही न्यूयॉर्कमधेच आहे. आता तर अनेक गल्यांमधले चविष्ट अड्डे शोधले आहेत.
पुन्हा एकदा सगळ्याचे सादर आभार.