या कवितेत कविची संभ्रमित अवस्था भावनिक(फ्रॉईड) व आर्थिक(मार्क्स) या दोन्ही पातळीवर जाणवते. पण
मार्ग कैसे वेगळे होतील दोघांचे?
पोटगीचा आकडा भंडावतो आहे!--
--- या कडव्यात मार्क्सचा विजय स्पष्ट होतो.
तसेच
रोज मागे वंदनेच्या लागतो आहे
एक डोळा शर्वरीवर ठेवतो आहे
--- या कडव्यात कवि 'बहुअवधानी' असल्याचे स्पष्ट होते.
मात्र इतर कडव्यातील प्रतिमा, कल्पना, उपमा (या सर्व साहित्यिक संज्ञा आहेत. गैऱसमज नसावा) सवयीने नेहमीच्याच आहेत असे खेदाने म्हणावे लागते.
(समीक्षक) जयन्ता५२