" आमच्या काळी असं होतं, आता सगळं बदललं आहे" असे सगळ्याच लोकांना वाटत असते याच वृत्तीचे  मार्मिक वर्णन या कवितेत केलेले दिसते. आता मर्सिडीजचा तारासुद्धा लुप्त पावलेला दिसतो. मी कित्येक वर्षात चौपाटीवर गेलो नाही, पण एका इमारतीच्या माथ्यावर लावलेला मर्सिडीजचा तीन पाकळ्यांचा ठळकपणे दिसणारा तारा माझ्या चांगला लक्षात आहे. पुलंच्या इतर लिखाणावरून त्यांना 'अपूर्वाई' किंवा 'पूर्वरंगा'चे वावडे होते असे मला वाटत नाही. ते निराशावादी तर मुळीच नव्हते.