लेखन आतिशय मार्मिक आणि मनाला भिडणारे आहे. सन्जय दत्त प्रकरणाचा आणि प्रसारमाध्यमांच्या मुजोरपणाचा विचार करता कुणीहि देशभक्त संतापल्याशिवाय रहाणार नाहि. प्रसारमाध्यमे फ़क्त सन्जय दत्तसार्ख्यां समाजकन्टक परंतु सेलिब्रेटि असलेल्यान्चि तळी उचलुन धरतात. त्यांच्या चाहत्यान्ना कॅमेरयासमोर आणतात. आणि बाबा आमटे, अणा हजारेन्सारखे खरे हिरो दुर्लक्शितच रहातात.

 पण परिस्थिती बदलण्यासाठि आपण काहिच करु शकत नाहि का? खरच आपण इतके लाचार झालो आहोत का? निदान आपण सन्जय आणि सलमान यांचे चित्रपट पहाणे सोडु शकत नाहि का? आपल्या कुटुंबाला आणि समविचारि मित्राना पराव्रुत्त करु शकत नाहि का? किन्वा राष्ट्रपतिंच्या नावे एक पोस्टकार्ड लिहुन आपल्या भावना व्यक्त करु शकत नाहि का?