मानसपंत,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सूर्य भोगणे ही कल्पना मात्र खटकली..त्याच्या तेजाला साजेशी कल्पना यायला हवी असे वाटते....सूर्य ल्यायणे किंवा सूर्य माळणे..किंवा ह्याही पेक्षा अधिक उचित आणि चपखल शब्द प्रयोग..आपणास काय वाटते?

'तेज अन् झळा दोन्ही मिळती
सूर्य भोगणे सोपे नसते'

यातला मला अभिप्रेत अर्थ -
महर्षी कर्व्यांबद्दल (त्यांची सून) इरावती कर्व्यांनी असं काहीसं म्हटलं होतं - 'माझं भाग्य म्हणून मी त्यांची सून झाले आणि त्याहून भाग्य म्हणून बायको झाले नाही'. मोठ्यांच्या सहवास उपभोगताना कीर्ती / वलय याबरोबरच हाल अपेष्टांनाही सामोरं जावं लागतं. 'भोगणे' मधे (चांगला/वाईट) दोन्ही अर्थ येतात. आपण म्हणता तसा दुसरा शब्द मला 'सोसणे' हा सुचला होता; पण तो एकार्थी वाटला. (पण ल्यायणे/माळणे या अर्थांनी मला हा शेर मांडायचा नव्हता.)

- कुमार

ता. क. कानेटकरांचें महर्षी कर्व्यांवर (आणि त्यांच्या बायकोवर आधारित) 'हिमालयाची सावली' हे अप्रतिम नाटक आठवलं म्हणून त्याचा संदर्भ दिला.