'ती' ऐवजी 'तो' केलं तर 'ईश्वर' या अर्थानं शेराला अजून एक वेगळा अर्थ लाभेल असं वाटतं. (ईश्वराला - सामान्य नाम म्हणून - स्त्रीलिंगी संबोधणं गैर नसलं तरी रूढ नाही असं वाटतं.)- दोन्ही अर्थ व्यक्त व्हावे म्हणून 'तो' लिहिण्याचा विचार मनात येऊनही मी दूर सारला याला कारण उर्दू शायरीत रूढ असलेली प्रेयसीला पुल्लिंगी संबोधण्याची रीत मराठीत नाही. त्यामुळे ही सोय आपल्याला उपलब्ध नाही. वाचक काही भलताच अर्थ काढतील!