दुसऱ्या शेराचा अर्थ - खरं तर ती सर्वांशीच हसून, मनमोकळेपणाने बोलते. या तिच्या स्वभावानुसार माझ्याशीही तशीच बोलते, वागते. पण माझ्या हे लक्षात आलं नाही. ती माझ्याशी हसून बोलत्येय यावरून मी गैरसमज करून घेतला की तिचं माझ्यावर प्रेम आहे. ती साऱ्यांशी अशीच वागते याकडे सोयिस्कर डोळेझाक करून सूतावरून स्वप्नातील स्वर्ग गाठून मोकळा झालो.