असा सहजसोपा, जास्त संघर्ष न करता आपण स्व:ता सोडून दोष दुसरीकडे देऊन मोकळे व्हायचे. ते केलत तुम्ही " श्री. काल्पनिक महाशय". आता पुढे काय?

पण मार खाण्याला भिऊन जर गांधीजी व इतर स्वातंत्रसैनीक जाऊ दे म्हणून बसले असते, बाबा आमटे कशाला मी काळजी करू कुष्ठरोग्यांची..., अण्णा हजारे म्हणाले असते की ग्रामसुधारणा झाली किंवा नाही काय घेणे आहे, मी माझे पेन्शन घेतो बास...,शतकानुशतके स्त्रीयांना शिक्षण नाही मिळाले कशाला त्यांना शिकवायचे फ़ुले, कर्वे म्हणाले असते तर ?? (नोकरी करणाऱ्या मुली "बायको" म्हणून मिळाल्या असत्या का?)

गंमत म्हणून ठीक आहे लेख, पण पटण्यासारखे काही नाही. आपल्या देशात / समाजात खूप दोष आहेत व ते घालवून टाकूया निदान आपल्यापुरते तरी. लेटस नॉट पास द बक.

ता.क. - कृपया  व्यक्तिगत घेऊ नका. असा सुर आहे की आजुबाजूला आजच्या पिढीचे काही लोक आहेत ते म्हणे असा विचार करतात. (मनोगतावरचे कोणी नाही हा) कृपया असे कोणी आढळल्यास त्यांना एकदा तरी असे नीट समजावून सांगणे स्व:ताचे सुजाण नागरीक म्हणून कर्तव्य समजा अन हीच देशसेवा, समाजसेवा समजा. जमल्यास या पुढे कोणी असे नकारात्मक काल्पनिक लेख लिहू नका हीच देशसेवा होईल. माझ्या देशाचे नाव ह्या नकारात्मक लेखात आहे, माझे माझ्या देशावर प्रेम आहे, म्हणून जरा कडक वाटेल अशी प्रतीक्रिया देत आहे. पण गंभीरतेने घ्या.