श्री. निनाद नाशिककर,

ह्यावर उपाय मला तरी असा वाटतो की ज्यांना कोणाला वृत्त वाहिन्यांचे हे वर्तन गैर वाटत असेल त्यांनी छापिल प्रसार माध्यमांकडे ह्या सगळ्याचा निषेध नोंदवावा. असे निषेधाचे प्रतिसाद प्रचंड प्रमाणात वृत्तपत्रांकडे पोहोचले आणि त्यांनी ते छापले तर वृत्त वाहिन्यांवर नक्कीच विचार करण्याची वेळ येईल. माझा वरील लेख मी 'सकाळ' आणि 'लोकसत्ता' कडे पाठवू इच्छितो. आणि त्या प्रयत्नात आहे.

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

mrudula,

प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

श्री. बाका,

सर्वप्रथम प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

'महात्मा' शब्दाचा वापर मी काय हेतूने केला आहे हे वरील एका प्रतिसादात स्प्ष्ट केले आहेच.

असल्या थिल्लर विषयावर प्रतिसाद देण्याची वेळ यावी, हे आमच्यासारख्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

खरेच. आपल्यावर कुणीतरी जबरदस्तीने अशी वेळ आणलेली दिसते आहे. अन्यथा, मनोगतावर प्रतिसादे देणे हे ऐच्छिक आहे. ज्यांनी कोणी तुमच्यावर अशी जबरदस्ती केली आहे त्यांचे चुकलेच आहे. मी तुमच्याशी सहमत आहे. कोणी कोणावर जबरदस्तीने अशी वेळ आणू नये. मनोगतावर  प्रतिसाद देणे/न देणे वाचकाच्या इछेवरच अवलंबून असावे. 'प्रतिसाद द्या' अशी कोणी कोणावर जबरदस्ती करू नये. मला जे लिखाण आवडत नाही त्यावर मी प्रतिसाद देत नाही. अजून, प्रतिसाद पाठवण्याची जबरदस्ती माझ्यावर तरी कोणी केलेली नाही. तशी कोणी केलीच तर मीही खपवून घेणार नाही. तात्काळ प्रशासकांना कळविन. (तुम्ही कळविले असेलच.)

पुनःच धन्यवाद.